‘खिलाडीयों का खिलाडी’

'खिलाडीयों का खिलाडी'

खिलाडी हा शब्द आला की आपल्या डोळ्यासमोर चेहरा येतो तो अक्षय कुमारचा. खिलाडी आणि अक्षय कुमार हे समीकरण १९९२ पासूनचं आहे. १९९२ साली आलेल्या खिलाडी चित्रपटापासून अक्षय कुमारची ‘खिलाडी’ इमेज तयार होत गेली आणि आजपर्यंत ती तशीच आहे. पण आजचा चित्रपट आहे ‘खिलाडीयों का खिलाडी’. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अक्षय कुमार, रविना टंडन, गुलशन ग्रोव्हर हे तर होतेच पण या चित्रपटाचे विशेष आकर्षण होतं ते म्हणजे निगेटिव्ह किंवा खलनायिकाची भूमिका साकारणारी रेखा. आपल्या ग्लॅमरने रेखाने या भूमिकेतूनही अनेकांची मनं घायाळ केली. याच खिलाडीयों का खिलाडी चित्रपटाला या आठवड्यात २५ वर्ष पूर्ण होतं आहेत आणि त्याच निमित्ताने टाकलेला हा टॉप फोकस.

Exit mobile version