१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे अवघा देश हादरला होता. तीन दशकांपूर्वी झालेल्या या घातपातात २५७ जणांचा बळी गेला, ७१० लोक जखमी झाले. देशात घटट् होत चाललेले माफीया, प्रशासन, पोलिस, आणि राजकारण्यांचे साटेलोटे या स्फोटांमुळे समोर आले. या अभद्र युतीचे समांतर सरकार देशात सुरू होते. एन.एन.व्होरा समितीच्या अहवालामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.