21 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024

अशांत लिबिया

Related

२०११ पासून गृहयुद्धाला बळी पडलेला लिबिया हा देश. ह्या गृहयुद्धामुळे उत्तर आफ्रिकेत बरीच राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली. अरब स्प्रिंगचा फायदा घेऊन अमेरिकेने गद्दाफीचा काटा काढला, दुसरे कोणतेही राजकीय नेतृत्व नसल्यामुळे देशात सत्तापोकळी निर्माण झाली. त्याचाच फायदा घेऊन लिबियन सर्वोच्च पदावर दोन जण आपला फायदा सांगू लागले. एकम्हणजेे जीएनएचे प्रमुख नेते आणि संसदीय लोकशाहीचे नेतृत्व अल सराज आणि दुसरे म्हणजे लिबियन नॅशनल आर्मीचे कमांडर बेलकासीम हफतर.

युएन आणि अमेरिका ह्यांच्या समर्थनाने पंतप्रधान झालेले अल सराज ह्यांना भारताने देखील पाठींबा दर्शवला आहे. २०१९ रोजी हफतर ह्यांनी लिबियाची राजधानी ट्रिपोली घेण्यासाठी मोहिम सुरु केली. ह्यावेळी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांनी ५०० भारतीयांना भारतात घेऊन येण्यासाठी खास मोहिम राबवली होती. आंतरराष्ट्रीय सत्ता खासकरुन टर्की, कतार, युनायटेड अरब अमिराती आणि रशिया ह्या देशांची ह्यात बरीच मोठी भूमिका आहे.

अनेक दहशतवादी गट गृहयुद्धाचा फायदा घेऊन लिबियातील शिरकाव करण्यासाठी उत्सुक आहेत. युरोपात अनधिकृतपणे शिरणाऱ्या आफ्रिकन लोकांसाठी तर हा देश एक उत्तम मार्ग समजला जातो.

गद्दाफीच्या काळात लिबिया येथे रहाणीमानाचा दर्जा हा संपूर्ण आफ्रिकेत उच्च समजला जात होता. आणि आता गृहयुद्धामुळे आर्थिक विकास हा जवळ जवळ नाहीच्याच बरोबर आहे. वस्तूंचा किंमती आणि साध्या सुविधांसाठी आकारले जाणारे शुल्क आकाशाला भिडत आहे. दोन लाखापेक्षा अधिक लोकं ह्या युद्धामुळे विस्थापित झाली आहेत तर, १३ लाख लोकं मानवतावादी मदतीवर अवलंबून आहेत. औषधांची कमतरता, मुलभूत सुविधांचा अभाव, दहशतवादी गटांचे हल्ले, बायका-मुलांची सतत होणारी अपहरणे ह्यामुळे सामान्य जनता अगदीच पिचून गेली आहे. तुरुंगसुद्धा कैद्यांनी मर्यादेपेक्षा अधिक भरले आहेत.

लिबियातील गृहयुद्धाचे विश्लेषण, परकीय सत्तांची भूमिका आणि तेलाचे राजकारण ह्याचे सविस्तर आकलन करण्यासाठी खालील विडीओ जरुर पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा