पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून ६५.६६ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल

पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून ६५.६६ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल

गेल्या वर्षीच्या तुलनेत ७८५% जास्त

उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि साप्ताहिक स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीटविरहित/अनियमित प्रवाशांचा धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्व वैध प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिका-यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले यामध्ये ६५.६६ कोटी रुपयांची दंड वसुली झाली.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जून २०२२ या महिन्यात २.६९ लाख तिकीट नसलेल्या /अनियमित प्रवासी यासह बुक न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळून आली आणि त्यांच्याकडून १७.८६ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण ९.४४ लाख तिकीट नसलेल्या /अनियमित प्रवासी आणि बुक न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळून आली होती, जी मागील वर्षातील याच कालावधीत १.३९ लाख प्रकरणे होती ज्यामध्ये ५७८% ऊल्लेखनीय वाढ झाली आहे . या प्रवाशांकडून ६५.६६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून गेल्या वर्षी याच कालावधीत ७.४२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

जो गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ७८५% जास्त आहे. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सतत अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे पहिल्या तिमाहीत ७,००१ अनधिकृत प्रवाशांवर दंड आकारण्यात आला.
Exit mobile version