२२ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या ८ मुस्लिमांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. २१ वर्षीय मुलीचे अपहरण करून, तिचे जबरदस्ती लग्न लावून धर्मांतर करायचा या टोळीचा डाव होता.
पिडीत मुलगी एटा जिल्ह्याची रहिवासी आहे. १७ नोव्हेंबर रोजी काही सामान आणायला स्थानिक बाजारात गेली असता तिचे अपहरण करण्यात आले. १७ डिसेंबर रोजी पीडितेच्या कुटुंबाला जावेद या आरोपीच्या वकिलाने पत्र पाठवले. पत्रात मुलीचा जावेद सोबत ‘निकाह’ झाला असून तिने इस्लाम स्विकारल्याची माहिती होती. यानंतर पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यात मुख्य आरोपी जावेद जरी फरार असला तरी त्याच्या ८ नातेवाईकांना आग्रा सीमेवर अटक करण्यात आली आहे.
आझमगड मध्ये तिघांच्या मुसक्या आवळल्या
आझमगड जिल्ह्यातील दीह कौठौल गावात धर्मांतर करणाऱ्या तीन ख्रिश्चनांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांची नावे भालचंद्र, गोपाळ प्रजापती आणि नीरज कुमार आहेत. स्थानिक गावकरी त्रिभुवन यादवच्या घरी यांनी गावकर्यांना एकत्रित केले आणि ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी आमिष देत होते. यासंबंधी अशोक कुमार नावाच्या गावकऱ्याने पोलिसांना माहिती दिली, ज्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
ग्रेटर नोएडा जिल्ह्यातूनही चौघांना उचलले.
ग्रेटर नोयडा जिल्ह्यातूनही चौघांना अटक करण्यात आली आहे, ज्यात ३ महिला आहेत. अटक केलेल्या महिलांपैकी एक महिला दक्षिण कोरियाची नागरिक आहे. हे महिला धर्मांतराचे कार्य करण्यासाठीच ग्रेटर नोएडा मध्ये स्थायिक झाली होती अशी माहिती समोर येत आहे.