भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केले आहे. ओरिसा मधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मध्ये ही चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारताची मारक क्षमतेत चांगलीच भर टाकणार आहे.
हे क्षेपणास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आणि इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. भारत डायनॅमिक्स या कंपनीने हे क्षेपणास्त्र बनवले आहे.
चाचणीच्या आधी बलसोरच्या स्थानिक प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आली. आसपासच्या अडीच किलोमीटर परिसरातील ८१०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.