आकाश क्षेपणास्त्र्याच्या निर्यातीला कॅबिनेटचा ‘हिरवा कंदील’

आकाश क्षेपणास्त्र्याच्या निर्यातीला कॅबिनेटचा ‘हिरवा कंदील’



भारत ‘आकश’ क्षेपणास्त्राची निर्यात करायला सज्ज झाला आहे. ‘आकाश’ च्या निर्यात प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे. ‘आकाश’ हे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सर्फेस टू एअर क्षेपणास्त्र आहे. भारत आपल्या मित्र राष्ट्रांना हे क्षेपणास्त्र निर्यात करेल.

आकाश क्षेपणास्त्राची निर्यात होणारी आवृत्ती ही सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळी असणार आहे. आकाश क्षेपणास्त्राचा पल्ला २५ किमी आहे. आकाश क्षेपणास्त्र हे ९६ टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय बनावटीचे आहे. ‘आकाश’ क्षेपणास्त्र हे कायमच इतर देशांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रदर्शनांत, डिफेन्स एक्स्पो मध्ये ‘आकाश’ साठी कायमच विचारणा होत असते.

आकाशच्या निर्यातीला मान्यता मिळाल्याने भारतीय उत्पादक निरनिराळ्या देशांच्या आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन) आणि आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) मध्ये सहभाग नोंदवू शकतात. ही प्रक्रिया जलद गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्र एक विशेष समिती स्थापन केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या समितीचे घटक आहेत.

आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत भारताची विविध संरक्षण सामग्री उत्पादन करण्याची क्षमता वाढत आहे ‘आकाश’ क्षेपणास्त्रासोबतच भारताच्या इतरही तंत्रज्ञानाला मागणी आहे. यात कोस्टल सर्व्हेलन्स यंत्रणा, रडार, आणि एअर प्लॅटफॉर्म्स यांचा समावेश आहे.

“पाच अब्ज डॉलर्सच्या डिफेन्स निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्त किंमतीची संरक्षण सामग्री निर्यात करण्यावर भारताचा भर आहे. यातून मित्र राष्ट्रांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील” असे सरंक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version