27.9 C
Mumbai
Thursday, April 17, 2025
घरस्पोर्ट्सकोहलीला बोल्ड करणारा हा बाहुबली कोण?

कोहलीला बोल्ड करणारा हा बाहुबली कोण?

Google News Follow

Related

भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोन याने उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू विप्रज निगम याचं कौतुक करताना त्याला दिल्ली कॅपिटल्ससाठी एक अफलातून शोध असे संबोधले आहे. आयपीएल २०२५ मध्ये विप्रजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) वर ६ गडी राखून विजय मिळवला.

(१) जिओस्टारवर सामन्यानंतर बोलताना आरोन म्हणाला, “विप्रजने आज कमालीचा खेळ केला. तो दिल्लीसाठी एक उत्कृष्ट शोध आहे. त्याने चेंडूने योगदान दिले आणि आपण पाहिलंच की, तो फलंदाज म्हणूनही आक्रमक ठरू शकतो. पुढील वाटचालीसाठी तो दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या गुंतवणुकीचं योग्य उदाहरण आहे. अशाच अधिक स्थानिक खेळाडूंची आपल्याला गरज आहे, जे आपल्या संघांना विजयी करण्यास मदत करू शकतील.”

(२) या मोसमात विप्रजचं प्रदर्शन दिल्लीसाठी एका प्रभावी कथा ठरत आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी घेतले, ज्यात विराट कोहलीचाही समावेश होता. कुलदीप यादवसोबत त्याने आरसीबीच्या मधल्या फळीत धक्कातंत्र वापरलं. कुलदीपने १७ धावांत २ बळी घेतले. दोघांनी मिळून २३ डॉट बॉल टाकले, ज्यामुळे फिल सॉल्ट आणि कोहलीच्या आक्रमक सुरुवतीनंतरही बेंगळुरूला फक्त १६३/७ धावांवर रोखता आलं.

(३) दिल्लीचे फिरकीपटू – अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि विप्रज निगम – आता आयपीएलमधील सर्वात बलाढ्य फिरकी तिकडी म्हणून उदयास आले आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवर गोलंदाजी करण्याची त्यांची क्षमता आणि अक्षर व निगमच्या अष्टपैलू कौशल्यामुळे के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ अधिक संतुलित दिसत आहे.

(४) दिल्लीचा मधला फळीचा फॉर्म चांगला आहे, ज्याचं श्रेय के.एल. राहुल आणि सातत्याने चमक दाखवणाऱ्या ट्रिस्टन स्टब्स यांना जातं, ज्यांनी सलग दोन सामने जिंकून दिले आहेत. मात्र त्यांचा टॉप ऑर्डर अजूनही डळमळीत आहे.

(५) ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टाइमआउट शोमध्ये तज्ज्ञ संजय बांगर आणि पीयूष चावला यांनी हे अधोरेखित केलं की, “जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस आणि अभिषेक पोरेल यांना चांगली सुरुवात मिळत नसल्यामुळे संघात काही चिंता कायम आहेत.”

हेही वाचा :

तहव्वूर राणाला मोदी सरकारने फरफटत आणले, काँग्रेस मात्र राणाच्या प्रेमात!

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे १०२ जणांचा मृत्यू!

राणाची इच्छा होती, २६/११ च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा!

शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!

बांगर म्हणाले, “भलेही गोलंदाजी आक्रमण चांगलं आहे, पण टॉप ऑर्डरमध्ये अजूनही समस्या आहेत.”
चावला म्हणाले, “संघ चांगल्या संतुलित रचनेत दिसतो, पण सुधारण्यासाठी नेहमीच वाव असतो… विशेषतः वेगवान गोलंदाजी आणि सुरुवातीचे विकेट्स या क्षेत्रात अजून मेहनत करण्याची गरज आहे.”

(६) सुरुवातीच्या संघर्षांनंतरही – जसे की मॅकगर्कचं चार डावांत सरासरी फक्त ११.५० असणं – दिल्ली कॅपिटल्सची खरी ताकद म्हणजे परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची व पुनरागमन करण्याची क्षमता. फलंदाजीमध्ये के.एल. राहुलची लवचिक भूमिका त्याच्या बहुपर्यायी कौशल्यांना अधोरेखित करते, विशेषतः मागील सामन्यात डु प्लेसिसच्या अनुपस्थितीत.

— आयएएनएस

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
242,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा