मुंबई, वानखेडे स्टेडियम.
संध्याकाळच्या त्या वाऱ्यात… दिव्यांच्या उजेडात… आणि वानखेड्याच्या जल्लोषात मुंबई इंडियन्सनं पुन्हा एकदा विजयी रणभेरी फुंकली! सनरायझर्स हैदराबादला चार गडी राखून हरवताना, एक दृश्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं – रोहित शर्मा!
हो! तोच हिटमॅन रोहित… जो शांत वाटत होता, पण आतून जळत होता!
१६ चेंडूंमध्ये २६ धावा… आणि त्यातले ३ फटके – आभाळात गेलेले छक्के!
जणू त्याच्या बॅटमध्ये पुन्हा जुनं तेज संचारलं होतं. पण दुर्दैवानं, पॅट कमिन्सच्या चेंडूवर कव्हरमध्ये झेल देत तो पावरप्लेमध्येच माघारी परतला.
पण या छोट्या खेळीनंही मार्क बाउचरला दिला विश्वास!
जिओहॉटस्टारवरील चर्चेत बाउचर म्हणाले,
“तो परत आला आहे! रोहितची नजर पुन्हा मोठ्या खेळीवर आहे. त्याचा ऍटिट्यूड, ते शॉट्स, ते आत्मविश्वास… लवकरच तो मोठा स्कोअर करणार!”
या सामन्याचे खरे हिरो ठरले इंग्लंडचे ऑलराउंडर विल जॅक्स!
३ ओव्हरमध्ये फक्त १४ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले, आणि फलंदाजीत २६ चेंडूंमध्ये ३६ धावा ठोकल्या.
बाउचर म्हणाले,
“जॅक्स हा केवळ पार्ट टाइमर नाही, तो खरा मॅचविनर आहे! आता त्याला आत्मविश्वास मिळालाय… आणि हा आत्मविश्वास मुंबईसाठी सोनं ठरणार!”
आणखी एक झळाळता चेहरा – हार्दिक पांड्या!
बॉलिंगमध्ये ४२ धावांत १ बळी घेत पर्पल कॅपच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानी,
आणि फलंदाजीत फक्त ९ चेंडूंमध्ये तुफान २१ धावा!
बाउचर म्हणतात,
“जेव्हा हार्दिक चांगलं खेळतो, तेव्हा टीम जिंकते! आता तो केवळ पावरप्ले नाही, तर मधल्या ओव्हरमध्येही प्रभावी ठरत आहे. आणि याचं प्रतिबिंब त्याच्या फलंदाजीतही दिसतं.”
आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत रविवारीच्या महाभिडतीकडे –
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स!
वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा साक्षीदार होणार इतिहासाचा…
धोनी विरुद्ध रोहित – नव्या पर्वाची नवी भिडंत!
🔥 “ही केवळ मॅच नाही, ही आहे प्रतिष्ठेची लढाई!” 🔥