फटकेबाजी, चौकार-षटकारांचा पाऊस आणि ऑरेंज कॅपची शर्यत!

फटकेबाजी, चौकार-षटकारांचा पाऊस आणि ऑरेंज कॅपची शर्यत!

क्रिकेटमध्ये काही फलंदाज असतात, जे मैदानावर आले की गोलंदाजांना विचार करायला वेळच मिळत नाही. त्यांची बॅट बोलते, आणि बोलते म्हणजे काय… तुफान गडगडत बोलते, धावांचा पाऊस पडतो! लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन याच कॅटेगरीत मोडतो. हा वेस्ट इंडियन डावखुरा म्हणजे एकदा मैदानात आला की चौकार-षटकारांचे पतंग उडवतो.

आता आयपीएल २०२५ सुरू होऊन अवघे तीनच सामने झालेत, आणि पूरनने १८९ धावा ठोकल्या आहेत. दोन अर्धशतकं ठोकली आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं – तब्बल ३२ चौकार-षटकार मारून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. सामना सुरू होतो काय आणि थोड्याच वेळात बॉल सीमारेषेच्या पलिकडे जाऊन विश्रांती घेतो!

पूरनच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन. त्याने ३ डावांत १८६ धावा केल्या आहेत आणि २५ चौकार-षटकार ठोकले आहेत. म्हणजे पूरनला जर कोणी टक्कर देऊ शकत असेल, तर तो आहे सुदर्शन! गुजरात टायटन्ससाठी यष्टीरक्षक म्हणून खेळणाऱ्या जोस बटलरनेही २३ चौकार-षटकार मारून तिसरं स्थान मिळवलं आहे.

आता चौथ्या क्रमांकावर येतो एक आपला ‘पक्का क्लासिक’ खेळाडू – पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर. दोन सामन्यांत २१ चौकार-षटकार ठोकत त्याने १४९ धावा काढल्या आहेत. या लिस्टमध्ये अजून एक नाव लक्षणीय आहे – ट्रॅव्हिस हेड! सनरायझर्स हैदराबादचा हा ऑस्ट्रेलियन खेळाडू २४ चौकार-षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा :

विराटच्या बोटाला लागलंय; पण आरसीबीच्या नशिबाला?

पीपीएफ खात्यात वारस अपडेटसाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत

भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मध्यरात्री लोकसभेत मंजूर

लखनौ सुपर जायंट्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेल्या मिशेल मार्शनेही आपली छाप सोडली आहे. त्याने ३ सामन्यांत २१ चौकार-षटकार मारले आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सहावं स्थान पटकावलं.

आता खरी गंमत पुढच्या सामन्यात आहे. पूरनचा चौकार-षटकारांचा धडाका असाच सुरू राहतो का, सुदर्शन आणि बटलर त्याला मागे टाकतात का, हेड आणि अय्यर मोठी खेळी करतात का – हे पाहणं रंजक ठरेल. क्रिकेटमध्ये काहीच सांगता येत नाही, पण एक नक्की – आयपीएल २०२५ मध्ये चौकार-षटकारांचा आतषबाजी शो सुरू झालाय, आणि तो थांबण्याची शक्यता नाही!

Exit mobile version