ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक लढतीत गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत कोलकाता नाइट रायडर्सवर ३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती ९० धावा, बी. साई सुदर्शनच्या ५२ आणि जोस बटलरच्या प्रभावी ४१ धावांच्या जोरावर १९८ धावांचा डोंगर उभारला. केकेआरसाठी आंद्रे रसेल आणि वैभव अरोराने प्रत्येकी एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवातच ढासळली. मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये रहमानुल्ला गुरबाजला माघारी धाडलं. अजिंक्य रहाणेने चार चौकारांसह डाव सावरायचा प्रयत्न केला, तर सुनील नरेनने एक चौका-एक षटकार ठोकून रंगत आणली, पण मग राशिद खानने त्याला तंबूत पाठवत केकेआरला दुसरा धक्का दिला. पॉवरप्लेमध्ये केकेआरचा स्कोअर होता ४५/२.
पिचवर चेंडू थांबून येत होता आणि उडी अनियमित होती – हीच गोष्ट गुजरातच्या फिरकीपटूंनी आपल्या फायद्याची केली. राशिद खान आणि वॉशिंगटन सुंदरने मधल्या षटकांमध्ये कसलेच फटकेबाजीला वाव दिला नाही. रहाणेने एकदाच सुंदरच्या गोलंदाजीवर चौका-षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं, पण त्याच ओव्हरमध्ये सुंदरने वेग वाढवून त्याला चकवलं आणि बटलरने स्टंपिंग करत मोठी विकेट मिळवली.
हेही वाचा :
“लोकशाहीमध्ये संसदचं सर्वोच्च!”
“मुस्लिमांनी देशाच्या कायद्यांचा आदर करून पालन केले पाहिजे”
बिहारमधील पहिली ‘नमो भारत रॅपिड रेल’ २४ एप्रिलपासून
हवाई दल अधिकाऱ्याचे दावे हवेत, त्यानेच केली होती मारहाण!
वेंकटेश अय्यर फारसा प्रभाव टाकू शकला नाही आणि साई किशोरच्या गोलंदाजीवर बाद झाला. आंद्रे रसेलने काही मोठे फटके खेळले, पण प्रसिद्ध कृष्णाने त्यालाही माघारी धाडलं. त्यानंतर रमनदीप सिंग आणि मोईन अलीही फार वेळ टिकू शकले नाहीत.
प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर संपूर्ण गुजरातच्या गोलंदाजीने केकेआरला एक क्षणही मोकळा श्वास घेऊ दिला नाही. अंगकृष रघुवंशी २७ धावांवर नाबाद राहिला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या शानदार विजयामुळे गुजरात टायटन्सने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आणि आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आपलं स्थान भक्कम केलं.