“सुपर ओव्हरमध्ये राजस्थानचा गेम ओव्हर!”

“सुपर ओव्हरमध्ये राजस्थानचा गेम ओव्हर!”

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मधील पहिला सुपर ओव्हर सामना बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला.

याआधी १८९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या. यामध्ये यशस्वी जयसवाल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी ५१ धावा केल्या.

राजस्थानच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. संजू सॅमसन आणि जयसवालने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर प्रभावी फटकेबाजी केली.

२० धावांवर आशुतोष शर्माकडून झेल गमावल्यावर, सॅमसनने विप्रज निगमच्या गोलंदाजीवर दोन पुल शॉट्स खेळले, ज्यात एक षटकार आणि एक चौकार होता. मात्र निगमच्या कट शॉटला चुकून सॅमसनला पसलांमध्ये मार लागला आणि तो ३१ धावा काढून मैदानाबाहेर गेला. आरआरने पॉवर-प्लेमध्ये ६३ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने रियान परागला आठ धावांवर धीम्या चेंडूवर बाद केले.

नितीश राणाने उत्कृष्ट फलंदाजी सादर केली. त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर पुल आणि रिव्हर्स स्वीप करत एक षटकार व एक चौकार मारला, आणि केवळ २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

गोलंदाजीसाठी आलेल्या स्टार्कने एक शानदार यॉर्कर टाकत राणाला ५१ धावांवर एल्बीडब्ल्यू बाद केले. यामुळे दिल्लीला पुनरागमनाची संधी मिळाली. ध्रुव जुरेल आणि शिमरोन हेटमायर यांनी प्रत्येकी दोन चौकार मारून आरआरला विजयाच्या जवळ नेले, पण स्टार्कने शेवटच्या षटकात पाच अचूक यॉर्कर टाकत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सकडून सामना खेचून घेतला. दिल्ली आता पाच विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे.


संक्षिप्त धावफलक:

दिल्ली कॅपिटल्स – २० षटकांत १८८/५
अभिषेक पोरेल – ४९, के. एल. राहुल – ३८
जोफ्रा आर्चर – २/३२, वानिंदु हसरंगा – १/३८

राजस्थान रॉयल्स – २० षटकांत १८८/४
नितीश राणा – ५१, यशस्वी जयसवाल – ५१
अक्षर पटेल – १/२३, कुलदीप यादव – १/३३

Exit mobile version