पाकड्यांची पुन्हा हार-हार!

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडेत पाकिस्तानला पराभूत करून मालिकेत अजेय आघाडी घेतली

पाकड्यांची पुन्हा हार-हार!

न्यूझीलंडने बुधवारी सेडन पार्कवर दुसऱ्या वनडेत पाकिस्तानला ८४ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.

मिशेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ५० षटकांत २९२/८ धावा केल्या. त्यानंतर किवींच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानसाठी लक्ष्याचा पाठलाग केवळ औपचारिकता ठरला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २९८ धावांवर गारद झाला.

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारानी घेतलेला हा निर्णय पाकिस्तानच्या पथ्याशी मात्र पडला नाही. न्यूझीलंडच्या सलामीवीर राइस मारियू आणि निक केलीने दमदार सुरुवात करून अवघ्या सहा षटकांत धावफलकावर ५० धावा ठोकून काढल्या.

मात्र, हारिस रौफने सातव्या षटकात केलीला बाद करत पाकिस्तानच्या जीवात जीव आणला. त्यानंतर, बाबर आझमने मारियूचा अप्रतिम झेल टिपला आणि यजमान संघाचा स्कोअर १५ व्या षटकात ९७/२ झाला.

यानंतर, डावखुरा फिरकीपटू सुफियान मुकिमने डेरिल मिशेल आणि हेन्री निकोल्सला बाद करत न्यूझीलंडचा स्कोअर १३५/४ असा केला. पाकिस्तानला न्यूझिलंडला कमी धावसंख्येवर रोखण्याची नामी संधी आली होती. परंतु मिशेल आणि मोहम्मद अब्बास यांनी ७७ धावांची महत्त्वाची भागीदारी रचत पाकिस्तानला नाकीनऊ आणले.

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अब्बासने संयमी खेळ करत ५२ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. अब्बास माघारी परतल्यानंतर, हे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण करत मोहम्मद वसीम ज्युनियरच्या अखेरच्या तीन षटकांत ४९ धावा काढल्या आणि न्यूझीलंडचा स्कोअर २९२/८ वर पोहोवचवा.

पाकिस्तानसाठी, डावखुरा फिरकीपटू मुकिम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ज्याने १० षटकांत ३३ धावा देत दोन गडी बाद केले. मोहम्मद वसीम ज्युनियर, ज्याने मालिकेतील पहिला सामना खेळला. त्याने १० षटकांत ७८ धावा देत दोन गडी घेतले.

२९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरची पार धूळधाण उडवली. जेकब डफी आणि विल ओ’रूर्के यांनी पहिल्या सहा षटकांत अब्दुल्ला शफीक (१), बाबर आझम (१) आणि इमाम-उल-हक (३) यांना बाद करत पाकिस्तानचा स्कोअर ९/३ असा दयनीय केला.

बेन सियर्सने रिझवान (५) आणि सलमान अली आगा (९) यांना स्वस्तात बाद करत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या आणि १२ षटकांत पाकिस्तानचा स्कोअर ३२/५ असा झाला.

हेही वाचा :

‘आतापर्यंत वक्फ विधेयकात जे बदल झाले, ते मौलवींच्या दबावामुळे!’

शुक्रिया मोदी जी ! भोपाळमध्ये मुस्लिम महिला मोदींच्या पाठीशी!

देशात मुलांना दत्तक घेण्याचा नवा विक्रम

संरक्षण क्षेत्रातील भारताची निर्यात किती वाढली बघा…

पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली, जेव्हा विल ओ’रूर्केच्या उसळी घेतलेल्या चेंडूवर हारिस रौफ जखमी झाला आणि माघारी परतला. त्याचा कन्कशन रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या नसीम शाहने आपल्या पहिल्या वनडेत अर्धशतक (४४ चेंडूत ५१ धावा) झळकावले आणि फहीम (८० चेंडूत ७३ धावा) याच्या साथीने नवव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली.

यानंतर, सियर्सने फहीमला बाद केले आणि त्यानंतर नसीम शाहही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेटकीपरकडे झेल देऊन माघारी परतला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजी तिकडीने – ओ’रूर्के (१/१९), डफी (३/३५) आणि सियर्स (५/५९) – सुरुवातीलाच पकड घेतली आणि पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही.

न्यूझीलंड: २९२-८, ५० षटके (मिशेल हे ९९ नाबाद, मोहम्मद अब्बास ४१; सुफियान मुकिम २-३३, मोहम्मद वसीम २-७८)
पाकिस्तान: २०८ सर्वबाद, ४१.२ षटके (फहीम अशरफ ७३, नसीम शाह ५१; बेन सियर्स ५-५९, जेकब डफी ३-३५)

Exit mobile version