आयपीएल २०२५ मध्ये मोहम्मद सिराज एका वेगळ्याच जोशात खेळताना दिसतोय. सलग दोन सामन्यांमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरल्यानंतर त्याच्या आत्मविश्वासाची आणि जबरदस्त लयाची झलक मिळते. मात्र या यशामागे एक भावनिक संघर्षाची गोष्ट लपलेली आहे, जी खुद्द सिराजने ‘सनरायझर्स हैदराबाद’ विरुद्ध ‘गुजरात टायटन्स’ सामन्यानंतर सांगितली.
भारतीय संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करूनसुद्धा सिराजला २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये संधी मिळाली नाही. बुमराह अनुपस्थित असतानाही, टीमला उंची आणि बाऊन्स मिळवणारा डावखुरा गोलंदाज हवा होता, म्हणून सिराजकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यातच आयपीएल नीलामीतही झटका – आरसीबीने त्याला रिटेन केलं नाही.
सिराज म्हणतो, “सुरुवातीला या गोष्टी स्वीकारणं खूप अवघड होतं. पण एक वेळ अशी आली की मी स्वतःलाच सांगितलं – अजून खूप क्रिकेट बाकी आहे, अजून स्वप्न बाकी आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी माझ्या नशिबी नव्हती, पण त्याचा विचार करत बसून काही होणार नव्हतं. मी फिटनेसवर काम केलं. ब्रेक मिळाला, चुका समजल्या आणि आता मी माझ्या बॉलिंगचा आनंद घेतोय.”
भारतीय संघातून वगळलं गेल्यावरचा काळ त्याच्यासाठी कठीण होता. पण तो डगमगला नाही. आई-वडिलांच्या आणि चाहत्यांच्या आशिर्वादाने त्याने पुन्हा स्वतःला उभं केलं.
आत्तापर्यंत सिराजने आयपीएल २०२५ मध्ये ४ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या असून तो सध्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
हेही वाचा :
मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता
भारतीय शेअर बाजार का झाला क्रॅश?
देवतांचं नव्हे तर आरोग्याचंही लाडकं जास्वंद
तो पुढे म्हणतो, “जेव्हा तुम्ही जसं विचारता, तसं घडतं – तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा चेंडूला दोन्ही दिशांनी स्विंग करता येतं, त्याचा एक वेगळाच आनंद असतो.”
घरच्या मैदानावरचा परफॉर्मन्स त्याला अधिक भावतो, कारण – “आज माझं संपूर्ण कुटुंब स्टँडमध्ये होतं. मेहनतीला फळ मिळालं, त्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही!”