29.3 C
Mumbai
Thursday, April 24, 2025
घरस्पोर्ट्स"एक ओव्हर, तीन रनआउट्स... आणि दिल्लीचं स्वप्न भंग!"

“एक ओव्हर, तीन रनआउट्स… आणि दिल्लीचं स्वप्न भंग!”

Google News Follow

Related

आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.
दिल्लीला २०६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र त्यांचा संपूर्ण संघ १९ षटकांत १९३ धावांवर ऑलआऊट झाला.


🔸 दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर-मॅकगर्क बाद झाला.
यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या करुण नायरने अभिषेक पोरेलसोबत भागीदारी करत दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली.

🔸 करुण नायरने केवळ ४२ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ५ षटकारांसह ८९ धावा केल्या.
मात्र, तो बाद झाल्यानंतर दिल्लीची फलंदाजी कोलमडली.
अभिषेक पोरेलने ३३ धावा केल्या, तर कर्णधार अक्षर पटेल (९) आणि ट्रिस्टन स्टब्स (१) काही विशेष करू शकले नाहीत.


🔥 सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला १९ वा षटक

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत दिल्लीचे आशुतोष शर्मा, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा हे तिघेही रनआऊट झाले, आणि तिथेच दिल्लीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.


🔹 त्याआधी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ५ गडी गमावून २०५ धावा केल्या.
ओपनर रायन रिकेल्टनने ४१, रोहित शर्माने १८ धावा करत वेगात सुरुवात केली.

🔹 सूर्यकुमार यादवने ४० आणि तिलक वर्माने ५९ धावा करत मधल्या फळीत चांगली भागीदारी केली.
नमन धीरने शेवटी केवळ १७ चेंडूंमध्ये नाबाद ३८ धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं.
तिलक आणि नमन यांच्यात ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.


🏆 या विजयासह मुंबई इंडियन्सने ६ सामन्यांत आपला दुसरा विजय मिळवला, तर सलग ४ सामने जिंकत सामन्यात आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा :

“एक ओव्हर, तीन रनआउट्स… आणि दिल्लीचं स्वप्न भंग!”

तृणमूलच्या खासदाराची “डोळे काढण्याची, हातपाय तोडण्याची” धमकी; काय आहे नेमकं प्रकरण?

मदरशांवरील कारवाईवर काय म्हणाले रजवी ?

तृणमूल काँग्रेस म्हणते, सीमासुरक्षा दलाच्या मदतीने मुर्शिदाबादेत दंगल!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
244,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा