32 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरस्पोर्ट्समुंबईकर ठरला 'मुंबई इंडियन्स'चा कर्दनकाळ

मुंबईकर ठरला ‘मुंबई इंडियन्स’चा कर्दनकाळ

Google News Follow

Related

ही गोष्ट आहे शुक्रवार रात्रीची. लखनऊच्या मैदानात, मुंबई इंडियन्सने २०४ धावांचं अवघड लक्ष्य गाठण्यासाठी झुंज सुरू केली होती. सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. आणि तिथेच घडला एक थोडा अनपेक्षित, थोडा वादग्रस्त निर्णय – तिलक वर्माला ‘रिटायर आउट’ करण्यात आलं!

सात चेंडूंमध्ये २४ धावांची गरज होती. खेळपट्टीवर तिलक वर्मा होता – २३ चेंडूत २५ धावा. बराच वेळ क्रिजवर होता, पण एकही फटके रेषा ओलांडत नव्हता. त्यामुळे एमआयने त्याला बोलावून घेतलं आणि त्याच्या जागी मिशेल सेंटनरला पाठवलं – जरा वेगाने धावा खेचण्याच्या आशेने.

तिलक आला होता नवव्या षटकात – ८६/३ अशा अवस्थेत. सूर्यकुमार यादवबरोबर त्याने चांगली भागीदारी रचली, पण सूर्या बाद झाल्यावर तिलकची खेळी थोडी अडखळली. एक ना दोन, धावा मिळेनात. खेळ थोडा खोल गेला आणि निर्णयही घ्यावा लागला.

सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक जयवर्धने म्हणाला,
“तिलकने चांगली भागीदारी केली, पण नंतर काही मोठे फटके निघत नव्हते. त्याला संधी दिली होती, पण त्याच्याकडून हवा तसा वेग येत नव्हता. म्हणून आम्ही वेगळा पर्याय वापरायचं ठरवलं.”

आता, क्रिकेटमधले काही निर्णय हे बुद्धीच्या पलीकडचे असतात. प्रेक्षक, माजी खेळाडू, टीकाकार – अनेकांनी या निर्णयावर बोट ठेवलं. काहींनी ‘जुगार’ म्हटलं, तर काहींनी ‘धाडस’ म्हणून कौतुक केलं. पण जयवर्धने ठाम – “संघासाठी घेतलेला निर्णय होता.”

कर्णधार हार्दिक पांड्यानेही जयवर्धनेच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तो म्हणाला,
“संघ म्हणून आपण जिंकतो आणि संघ म्हणूनच हरतो. कुणा एकट्यावर दोष टाकता येत नाही. पूर्ण फलंदाजी क्रमाने जबाबदारी घ्यायला हवी. आणि मी ती घेतो.”

हेही वाचा :

काँग्रेस नेतेच म्हणतात जमिनींचा गैरवापर झाला होता

कशी आहे श्रीराम पूजनाची योग्य पद्धत?

हिंदू असल्याचे भासवून दलित तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आसिफला ठोकल्या बेड्या

हरियाणातील तरुणांनी काय चंग बांधलाय बघा!

तरीही सत्य हेच – हा ‘प्लॅन’ काही कामी आला नाही. मुंबई इंडियन्स १२ धावांनी हरली.
लखनऊ सुपरजायंट्सने अखेरच्या क्षणी सामना खेचून नेला आणि मुंबईची तिसरी हार नोंदवली.
चार सामन्यांनंतर मुंबई सातव्या क्रमांकावर, तर लखनऊ सहाव्या.

क्रिकेटमध्ये काही निर्णय हे बादले की बुद्धीला पटतात. पण काही निर्णय असेही असतात – जेव्हा बुद्धीच म्हणते, “थांब, विचार करतोय…”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा