27 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरस्पोर्ट्सभारताचा रग्बी स्टार मोहित खत्री ठरला सर्वात महागडा खेळाडू; RPL सीझन १...

भारताचा रग्बी स्टार मोहित खत्री ठरला सर्वात महागडा खेळाडू; RPL सीझन १ ला जूनमध्ये धमाकेदार सुरुवात!

Google News Follow

Related

पहिल्यांदाच, फ्रँचायझी आधारित रग्बी प्रीमियर लीग (Rugby Premiere League) भारतात आयोजित केली जाणार आहे. जीएमआर आणि इंडियन रग्बी फुटबॉल युनियन यांनी आयोजित केलेल्या या लीगच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन जूनमध्ये मुंबईत केले जाईल ज्यामध्ये सहा संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.

पहिल्या सीझनमध्ये , बेंगळुरू ब्रेव्हहार्ट्स (bengluru Brave Hearts) , चेन्नई बुल्स (Chennail Bulls), दिल्ली रेड्स (Delhi Raids), हैदराबाद हिरोज (Hyderabad Heroes), कलिंगा ब्लॅक टायगर्स (Kalinga Black Tigers) आणि मुंबई ड्रीमर्स (Mumbai dreamers) मैदानात उतरतील. प्रत्येक संघाने १३ खेळाडूंचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये ड्राफ्टद्वारे निवडलेले आठ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि लिलावाद्वारे निवडलेले पाच भारतीय खेळाडूंचा समावेश होता.

Rugby Premiere League लिलावात मोहित खत्रीला बेंगळुरू ब्रेव्हहार्ट्सने ४.७५ लाख रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे तो भारतातील सर्वात महागडा रग्बी खेळाडू बनला. त्याच्यासोबत करण राजभर, अर्पण छेत्री, सुरेश कुमार आणि प्रशांत सिंग यांनाही संघात समाविष्ट करण्यात आले.

ही स्पर्धा १ जून रोजी रग्बी सेव्हन्स (Rugby Sevens) स्वरूपात सुरू होईल आणि १५ जून रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसह संपेल. भारत आणि जगभरातील ४८ आंतरराष्ट्रीय खेळाडू ३४ सामन्यांमध्ये भाग घेतील, ज्यात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, फिजी, अर्जेंटिना, आयर्लंड आणि यूएसए सारख्या देशांचे स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

जीएमआर स्पोर्ट्सचे सीईओ सत्यम त्रिवेदी म्हणाले, “आरपीएल भारतातील रग्बीला एक नवीन आयाम देईल. यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर शिकण्याची उत्तम संधी मिळेल.”

इंडियन रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष राहुल बोस म्हणाले, “सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे. वर्ल्ड रग्बीच्या मदतीने आम्हाला १५ दिवसांची विंडो मिळाली ज्यामध्ये जगभरातील स्टार खेळाडू उपलब्ध आहेत.”

हे ही वाचा 

Viral Video: ‘अत्याचार’: ‘साहेब, मला वाचवा…’,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा