गायकवाडच्या दुखापतीने चेन्नईच्या गोटात एक गोंधळ निर्माण झाला आहे – आणि तिथेच पुन्हा एकदा त्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, जे नाव केवळ कर्णधार म्हणून नाही, तर एक अध्याय म्हणून ओळखलं जातं – एम.एस. धोनी!
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू, आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू शेन वॉटसनने एक ठाम मत मांडलं आहे –
“जर गायकवाड वेळेवर तंदुरुस्त नसेल, तर धोनीने पुन्हा कप्तानीची सूत्रं हातात घ्यायला हरकत नाही!”
तो म्हणतो, “एमएसडी आधीच मैदानावर नेतृत्व करत असतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा रुतुराजला मार्गदर्शन करतो. त्यामुळे, गरज पडलीच तर त्याचा कर्णधारपदावर परतणं हे सहज आणि सुसंगत पाऊल असेल.”
दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी, चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनीसुद्धा धोनीच्या संभाव्य नेतृत्वाची संधी उघडपणे नाकारलेली नाही. पत्रकारांनी विचारलं – “रुतुराज नसेल, तर धोनी पुन्हा कप्तान होईल का?”
हसीचं उत्तर थोडं धूसर – “मी फारसा विचार केला नाही, पण फ्लेमिंग आणि रुतूने कदाचित केला असेल.”
गायकवाडच्या दुखापतीचा किस्सा म्हणजे रविवारी राजस्थानविरुद्ध खेळताना दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेचा चेंडू त्यांच्या उजव्या हातावर आदळला. त्यामुळे त्याची पुढील सामन्यातील उपलब्धता संशयात आहे.
जर गायकवाड फिट नसेल, तर सीएसकेला मधल्या फळीची मांडणी नव्याने करावी लागेल. डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र सलामीला येऊ शकतात, तर राहुल त्रिपाठी क्रमांक तीनवर उतरेल अशी शक्यता.
हेही वाचा :
काँग्रेस नेतेच म्हणतात जमिनींचा गैरवापर झाला होता
काँग्रेस नेतेच म्हणतात जमिनींचा गैरवापर झाला होता
कशी आहे श्रीराम पूजनाची योग्य पद्धत?
या मंत्रामुळे उघडतील सुख-समृद्धीचे दरवाजे
हसी सांगतो,
“पॉवरप्लेमध्ये आम्ही काही उत्तम गोलंदाजांचा सामना केला आहे, त्यामुळे सुरुवात चांगली झाली नाही. पण मला आमच्या टॉप ऑर्डरवर अजूनही विश्वास आहे – विशेषतः दिल्लीविरुद्ध चांगला खेळ करतील.”
आणि ज्या वेळी नेतृत्वाची चर्चा होते, तेव्हा २०२३ च्या फायनलची आठवण होणं अपरिहार्य आहे – धोनीने गुजरात टायटन्सविरुद्ध अंतिम सामन्यात जिंकून सीएसकेला पाचवा आयपीएल किताब मिळवून दिला होता.
कधी वाटतं, धोनीचा शेवटचा सामना पाहून आपण निरोप घेतला… पण धोनी आहे तिथे, ‘शेवट’ हा शब्द फार काळ टिकत नाही!