आयपीएल २०२५ मध्ये फलंदाजांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. काही मोजके सामने वगळता, बहुतेक सर्व सामने हाय-स्कोअरिंग ठरले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत विविध संघांकडून एकूण १५ खेळाडूंनी अर्धशतक ठोकले आहे. यामध्ये ८ भारतीय आणि ७ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय खेळाडू ज्यांनी अर्धशतके झळकावली
-
ध्रुव जुरेल (राजस्थान रॉयल्स) – सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक (२ सामन्यांत १०३ धावा, सर्वोत्तम – ७०)
-
संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) – २ सामन्यांत ७९ धावा, सर्वोत्तम – ६६
-
श्रेयस अय्यर (पंजाब किंग्ज) – पहिल्या सामन्यात ९७ धावा
-
साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) – पंजाब किंग्जविरुद्ध ७४ धावा
-
अजिंक्य रहाणे (कोलकाता नाईट रायडर्स) – आरसीबीविरुद्ध अर्धशतक (२ सामन्यांत ७४ धावा, सर्वोत्तम – ५६)
-
आशुतोष शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) – ६६ धावा
-
विराट कोहली (आरसीबी) – ५९ धावा
-
ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज) – मुंबई इंडियन्सविरुद्ध ५३ धावा
हेही वाचा :
अर्थसंकल्पिय अधिवेशन निरर्थक, अपयश लपवणारे!
छत्तीसगडमध्ये दीड महिन्यात ३२५ हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन हजारांचे आत्मसमपर्ण!
बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले
वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली
विदेशी खेळाडू ज्यांनी अर्धशतके झळकावली
-
क्विंटन डी कॉक (केकेआर) – राजस्थान रॉयल्सविरुद्ध ९७ धावा (२ सामन्यांत १०१ धावा)
-
निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स) – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७५ धावा
-
मिशेल मार्श (लखनऊ सुपर जायंट्स) – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७२ धावा
-
ट्रॅव्हिस हेड (सनरायझर्स हैदराबाद) – राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६७ धावा
-
रचिन रवींद्र (चेन्नई सुपर किंग्ज) – ६५ धावा
-
फिल सॉल्ट (आरसीबी) – ५६ धावा
-
जॉस बटलर (गुजरात टायटन्स) – ५४ धावा
आयपीएल २०२५ हंगामात आतापर्यंत फलंदाजांनी आपली ताकद दाखवली आहे. पाहूया, पुढील सामन्यांमध्ये आणखी कोणते विक्रम घडतात!