भारताचा आघाडीचा तिरंदाज रजत चौहान याचं स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे, कारण कंपाउंड तिरंदाजी आता २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट होणार आहे.
२०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता असलेला रजत चौहान नेहमी ऑलिंपिक पदकाचं स्वप्न बघत होता. इतकंच नव्हे, तर त्याने २०१६ मध्ये आपल्या उजव्या हातावर ऑलिंपिकचे पाच वलय गोंदवले होते – स्वप्नाच्या प्रतीक म्हणून!
रजत म्हणतो, “ही संधी अखेर मिळाली आहे याचा संपूर्ण भारताला अभिमान वाटेल. २०१६ मध्ये मी जेव्हा ऑलिंपिक रिंग्सचं टॅटू काढलं होतं, तेव्हाच हा दिवस येईल याची आशा होती. पण आज एवढा आनंद झालाय की रात्रभर झोपच लागली नाही.“
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) नुकतीच घोषणा केली की कंपाउंड मिक्स्ड टीम स्पर्धा आता एलए २०२८ मध्ये ऑलिंपिक तिरंदाजी कार्यक्रमात अधिकृतपणे समाविष्ट केली जाईल.
या नव्या समावेशामुळे आता तिरंदाजीमध्ये एकूण ६ पदके दिली जातील:
-
पुरुष वैयक्तिक
-
महिला वैयक्तिक
-
पुरुष संघ
-
महिला संघ
-
रिकर्व मिक्स्ड टीम
-
आणि आता कंपाउंड मिक्स्ड टीम स्पर्धा
१९७२ मध्ये तिरंदाजी पुन्हा ऑलिंपिकमध्ये आली होती, पण तोपर्यंत फक्त रिकर्व प्रकार होता. आता ५ दशकांनंतर पहिल्यांदाच नवीन “धनुष्य शैली” ऑलिंपिकमध्ये प्रवेश करत आहे.
कंपाउंड बाउ, जो अमेरिका येथे विकसित करण्यात आला, यामध्ये कॅम आणि पुली प्रणालीचा वापर होतो, ज्यामुळे तीर अधिक वेगाने आणि अचूकतेने लक्ष्यावर जातो. १९९५ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा वापर सुरू झाला आणि गेल्या काही वर्षांत यामध्ये मोठी प्रगती झाली.
हा प्रकार २०१३ पासून जागतिक स्पर्धांमध्ये, तसेच अमेरिका, आशिया, युरोप आणि पॅसिफिकमध्ये झालेल्या बहु-खेळ स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळला जातो.
रजत चौहान सध्या राजस्थान पोलिस दलात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या कारकिर्दीत:
-
एक जागतिक रौप्य पदक
-
एशियन गेम्सचे एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक
-
चार आशियाई चॅम्पियनशिप पदके (२ सुवर्ण, २ रौप्य)
२०२८ मध्ये हे स्वप्न देखील पूर्ण होणार असून, भारताला ऑलिंपिक पदक मिळवण्याची नवी आशा मिळाली आहे!