इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) २०२५ च्या १४ व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा ८ गडी राखून पराभव केला. गुजरातकडून जोस बटलरने नाबाद ७३ धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला.
आरसीबीने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने डावाची सुरुवात सावधपणे केली. कर्णधार शुभमन गिलच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला.
गिल १४ धावा करून बाद झाला. यानंतर, साई सुदर्शनने जोस बटलरसह डाव पुढे नेला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ७५ धावांची भागीदारी केली. तथापि, साई सुदर्शनचे अर्धशतक हुकले आणि तो ४९ धावा करून बाद झाला.
त्यानंतर बटलरला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शेरफान रुदरफोर्टने संघाला विजय मिळवून दिला. रुदरफोर्ड ३० धावांवर नाबाद राहिला आणि जोस बटलर ७३ धावांवर नाबाद राहिला.
आरसीबीकडून फक्त भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली (७ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (४ धावा) लवकर बाद झाले. त्यानंतर, पॉवर प्लेच्या अखेरीस, फिल साल्ट (१४ धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (१२ धावा) देखील पॅव्हेलियनमध्ये परतले. लियाम लिव्हिंगस्टोन (५४) आणि जितेश शर्मा (३३) यांनी डाव सावरला आणि धावसंख्या सन्मानजनक पातळीवर नेली. शेवटी, टिम डेव्हिडने १८ चेंडूत ३२ धावा करून आरसीबीचा धावसंख्या १६९ पर्यंत नेला.
गुजरातकडून, मोहम्मद. सिराजने तीन आणि साई किशोरने दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
हे ही वाचा
आरसीबी बनला इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला आयपीएल संघ