१७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, एक संघ पुन्हा उभा राहतोय… धुळीत गेलेल्या इतिहासाला खांद्यावर घेऊन, नवा स्वप्नवत प्रवास सुरू करतोय – नाव आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू!
वानखेडेवर १० वर्षांनी विजय
आरसीबीने मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरातच १२ धावांनी हरवलं.
“जिस मैदान पर तू राजा समझता था खुद को… तिथे आज आमचा दरबार भरलाय!”
वानखेडेवर आरसीबीचा विजय शेवटचा २०१५ मध्ये झाला होता. आता २०२५ मध्ये, त्यांनी इतिहासाची पानं उलटी केली.
एक हंगाम – तीन गड – तीन दिग्गज – आणि आरसीबीचा धडाका!
-
मुंबई – हरवले
-
चेन्नई – पराभूत
-
कोलकाता – शरण
“घर तुझं असो वा मैदान… जेव्हा आरसीबी उतरते, तेव्हा फक्त एकच आवाज येतो – ये तो आग है!”
आयपीएलच्या इतिहासात ही फक्त दुसरी वेळ आहे, जेव्हा कोणत्याही संघाने हे तिन्ही संघ त्यांच्या घरी हरवले आहेत.
कॅप्टन पाटीदार – लीडर नाही, हीरो आहे!
४ सामन्यात १६१ धावा, १७५ चा स्ट्राइक रेट, दोन प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार
“राजा बनके राज करूंगा… मैदानावर नाही, विरोधकांच्या मनावर!”
रजत पाटीदारनं कॅप्टन्सीचा भार नाही घेतला… त्याने आरसीबीचा आत्मा बनून खेळ दिला!
विराट कोहली – शांत तलवार, पण धार जबरदस्त!
१६४ धावा, ६ सिक्सर, १५ चौकार
“मैं झुकेगा नहीं साला!”
(आणि या मोसमात त्याचं बॅटिंग बघून वाटतंय – तो अजूनही ‘किंग’च आहे!)
टॉप-३ मध्ये एन्ट्री – आणि ट्रॉफीवर नजर!
तीन विजय, एक पराभव आणि पॉझिटिव्ह नेट रन रेटसह आरसीबी सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
“अब जो आया है… वो जाएगा नहीं बिना ट्रॉफी लिये!”
पटकथेनुसार आता शेवट जवळ आलाय…
आरसीबी म्हणतेय, “ट्रॉफी आमची आहे… कारण आमचं खेळणं नाही बदललं, आमचं ‘इरादा’ बदललाय!”