झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी सात जणांना उमेदवारी जाहीर

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी सध्या राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

झीशान सिद्दिकी यांनी पक्ष प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे. पक्ष प्रवेशावेळी झिशान सिद्दिकी थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांची उणीव कायम भासणार असल्याचे त्यांनी म्हणत आता निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे ते म्हणाले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दिकी म्हणाले की, “कठीण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत. त्यांनी मला मदत केली. रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल. काँग्रेसने अनेकवेळा संपर्क साधला मात्र, त्यांनी ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आला आहे. वरुण सरदेसाई यांचे आव्हान मानत नाही, जनता मला रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकवेल,” असं ते म्हणाले.

हे ही वाचा : 

जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!

अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत ३८ उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटाची दुसरी यादी

Exit mobile version