30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणप्रज्वलसारख्या लोकांसाठी झिरो टोलरेंस धोरण, कर्नाटक सरकारने दिली देश सोडण्याची परवानगी

प्रज्वलसारख्या लोकांसाठी झिरो टोलरेंस धोरण, कर्नाटक सरकारने दिली देश सोडण्याची परवानगी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्वल रेवण्णा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी मांडले परखड मत

Google News Follow

Related

जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा गोंधळ उडाला असून विरोधकांनी या प्रकरणावरू भाजापाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत या मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

“प्रज्वलसारख्या लोकांसाठी आमच्याकडे झिरो टोलरेंस धोरण म्हणजेच शून्य सहिष्णुता आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे. पुढे नरेंद्र मोदी असे म्हणाले की, “कर्नाटक सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिली. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली असती तर त्याला गुजरात सरकार जबाबदार असते, तसेच कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशात झाल्यास त्याला तिकडचे राज्य सरकार जबाबदार असते. या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची होती,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर केली आहे.

“प्रश्न जो पर्यंत मोदींचा आहे, भाजपा आहे, आपल्या संविधानाचा प्रश्न आहे तर, माझे स्पष्ट मत आहे की, अशा लोकांविरुद्ध शून्य सहनशीलता असली पाहिजे. यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत,” असे परखड मत नरेंद्र मोदींनी मांडले. “एकाच वेळी समोर आलेल्या हजारो व्हिडीओतून हे लक्षात येतं की या एकाच दिवसातील व्हिडीओ नाहीत. हे व्हिडीओ जेडी(एस) काँग्रेससोबत युतीत होते तेव्हापासूनचे आहेत. हे व्हिडीओ ते सत्तेत असताना गोळा करण्यात आले होते आणि आता ते निवडणुकीच्या वेळी समोर आणले गेले,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्याला देशाबाहेर पाठवल्यानंतर व्हिडिओ समोर आले. राज्य सरकारला माहिती असती तर त्यांनी पाळत ठेवायला हवी होती आणि विमानतळावर लक्ष ठेवायला हवे होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

झारखंड रोख रक्कम जप्तीचे प्रकरण; १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागावरून कोट्यवधींची वसुली

ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स

“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!

प्रज्वल रेवण्णा हे हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. जेडीएस आणि भाजपाने राज्यात युती केली आहे. युतीकडून त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. याच दरम्यान रेवण्णा यांच्या प्रकरणी काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे रेवण्णा हे अडचणीत सापडले आहेत. रेवण्णा देश सोडून पळून गेले असून ते जर्मनीमध्ये असल्याची माहिती आहे. रेवण्णा यांचे कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. हे व्हिडिओ हजारोंच्या संख्येने असून प्रज्वल यांच्या वडिलांना पोलिसांकडून अटक झाली आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात देखील ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा