संपूर्ण देशातच कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात त्या जोडीला लसीकरण मोहिम देखील चालू आहे. मुंबई महानगरपालिकेने लसीकरणासाठी जागतिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ग्लोबल EOI) काढले होते. परंतु पालिकेच्या या निविदेकेडे सर्वांनीच पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला आहे.
पालिकेने आपल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी १२ मे रोजी ग्लोबल टेंडर काढले होते. त्या टेंडर बाबत १६ मे पर्यंत काही प्रश्न असतील तर ते पाठवणे अपेक्षित होते. मात्र पालिकेला अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे काही प्रश्न अथवा शंका प्राप्त झालेल्या नाहीत.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना
चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी
ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे
व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल
पालिकेचे लस खरेदीचे अतिरिक्त अधिकारी पी वेलरासू यांनी सांगितले की,
रविवारपर्यंत कोणीही निवीदा भरलेली नव्हती. आम्ही इओआयच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे आणि त्यानंतर ठरवू की निविदेची शेवटची तारिख पुढे ढकलायची की नाही हे ठरवू
महानगरपालिकेने काढलेल्या जागतिक निविदेनुसार ही निविदा मिळवणाऱ्या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर तीन आठवड्याच्या आत लसींचा पुरवठा करावा लागणार आहे. महानगरपालिकेने १ कोटी लसींसाठी निवीदा काढली होती.
महानगरपालिकेला या निविदेमध्ये फायझर, मॉडर्ना, स्पुतनिक आणि जॉन्सन अँड जॉन्सन या सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ही निविदा भरणे अपेक्षित होते. त्यासोबत भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एसआयआय) या भारतीय कंपन्यांकडून देखील पालिकेला अपेक्षा होत्या. यापैकी मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींना भारतात परवानगी मिळालेलीच नाही.
या जागतिक निविदेच्या अटीमध्ये भारताशी सीमा असणाऱ्या देशांतील कंत्राटदारांनी ही निवीदा भरण्यास परवानगीच नाही. त्यामुळे पालिकेच्या निविदांमधून चिनी कंपन्यांना आपोआप बाद केले गेले आहे.
काही अधिकाऱ्यांच्या मते पुरेशा प्रमाणात कंत्राटदार पुढे आले नाहीत, तर पालिका अंतिम मुदत वाढवू शकते.