वांद्रे पूर्व भागातील नव्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात लसी कमी आणि पोस्टर जास्त, असं म्हणत झिशान यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यावरच भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला घेरले आहे.
रोज जोड्याने हाणतायत…
काँग्रेसच्या झीशान सिद्दीकीने गर्दी वरून शिवसेनेला हाणले. बहुधा ईदनिमित्त इदी दिली असावी… https://t.co/1FppAQbf6F— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 14, 2021
“रोज जोड्याने हाणतायत. काँग्रेसच्या झीशान सिद्दीकीने गर्दी वरून शिवसेनेला हाणले. बहुधा ईदनिमित्त इदी दिली असावी.” असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी सेनेवर बोचरी टीका केली आहे.
“वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. इथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!” अशा शब्दात झिशान सिद्दीकी बरसले. झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या तीन-चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत.
हे ही वाचा:
सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?
जयंत पाटील मुख्य सचिवांवर संतापलेच नाहीत
स्पुतनिक लसीचीही किंमत झाली जाहीर
वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला होता.