केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेने राडे घालायला प्रारंभ केला असून शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी नारायण राणे यांच्या मुंबईतील घराकडे कूच केले होते, पण पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे की हिरक महोत्सव अशी विचारणा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली होती. तो संदर्भ घेत नारायण राणे यांनी यासाठी कानाखाली आवाज काढायला हवा, असे म्हटले. त्यावरून विविध ठिकाणीस त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रात नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलनांना सुरुवात केली.
युवासेने नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासेनेने नारायण राणे यांच्या जुहूतील घरावर मोर्चा काढला. राणेंच्या घराबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटात धुमश्चक्री झाल्याने पोलिसांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत त्यांना रोखले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयांवरही आक्रमण करत तोडफोड केली. एकूणच नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर स्टंटबाजी करण्याची संधी शिवसेनेला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा:
ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ
अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स
अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र
टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!
नारायण राणे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने चिपळूणमध्ये आहेत. तिथे त्यांना अटक करण्यासाठी नाशिकचे पोलिस पथक रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.