भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कॉंग्रेसवर नाराज असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न

भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपासून देशभर भारत जोडो यात्रेद्वारे दौरा करत आहेत. सध्या राहुल गांधी त्यांची सत्ता असलेल्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, भर यात्रेत एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी यांच्या राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. ही यात्रा सध्या राजस्थानमधील कोटामध्ये आहे. इथे एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने स्वतःला पेटवून घेतले आहे. आजूबाजूच्या लोकांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. तरुण वर्ग काँग्रेसच्या धोरणावर नाराज असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे या तरुणाने सांगितले आहे.

राहुल गांधी हे गेल्या चार महिन्यांपासून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राज्यांना भेटी देतं आहेत. आतापर्यंत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पदयात्रा केली आहे. सध्या ते त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये आहेत. तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने राजस्थान काँग्रेसवर नाराज असल्याचे म्हटले जातं आहे.

हे ही वाचा :

काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर अनेक आरोप होताना दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दाखवले जाते. मात्र, काही दिवसांपूर्वीच एका तरुणाने यात्रेमध्ये गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटतं असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप एका सहभागी कार्यकर्त्याने केला होता. भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी तसेच विविध कामांसाठी पैसे दिले जातात, असे तरुणाचे म्हटले होते.

Exit mobile version