तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात?? अशी घणाघाती टीका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुनच नितेश राणे यांनी टीका केली आहे.
जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..
तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..
मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
मानले @BJYM4Mumbai ला !!— nitesh rane (@NiteshNRane) June 16, 2021
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून ५ किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
हे ही वाचा :
कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने गाठला ७१ दिवसांचा निचांक
शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा
शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”
शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती
आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.