27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणतुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

Google News Follow

Related

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. “तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो.” असं राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांना म्हणाले. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान ३० ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा