भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह- प्रभारी सुनिल देवधर यांनी ट्वीटरवर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच फिरकी घेतली. केंद्राने दिलेले तुम्ही विकून मोकळे होता या शब्दात त्यांनी आव्हाडांना टोला लगावला.
काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. आधी फडणवीस मग त्यावर जितेंद्र आव्हाड त्यानंतर प्रविण दरेकर अशा तऱ्हेने सर्व नेत्यांनी एकमेकांवर फैरी झाडल्या. त्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ट्वीटवरून टोला हाणताना सुनिल देवधर यांनी ट्वीट केले की, ‘केंद्र सरकारने दिले की तुम्ही विकून मोकळे होता. गरिबांना रेशनचा तांदूळ दिला तोही विकून खाल्लात.’
केंद्र सरकारने दिले की तुम्ही विकून मोकळे होता.
गरिबांना रेशनचा तांदूळ दिला तोही विकून खाल्लात. @Awhadspeaks https://t.co/YqoSU5atUC
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) April 3, 2021
हे ही वाचा:
सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात
मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख
नेमके घडले काय?
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या शैलीत महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जगातील विविध देशांच्या लॉकडाऊनचे उदाहरण दिले होते. मात्र त्या सरकारांनी केलेल्या उपाययोजनांबद्दल मुख्यमंत्री मूग गिळून गप्प होते.
त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात त्यांनी त्या त्या देशातील सरकारांनी केलेल्या उपायांची यादी मांडून दाखवली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ‘ही मदत तिथल्या केंद्र सरकारने दिलेली आहे’ अशा स्वरूपाचे ट्वीट करून सरकारच्या बचावाचा प्रयत्न केला.
त्यावर प्रत्युत्तर देताना सुनिल देवधर यांनी जोरदार चपराक लगावणारे ट्वीट केले आहे