भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी निखिल वागळे यांची चांगलीच खरडपट्टी काढली. निखिल वागळे यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भातखळकर यांचा हा वार वागळे यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी पातळी सोडून भातखळकर यांच्यावर टीका केली. पण यावरूनही भातखळकरांनी वागळेंना जोरदार चिमटा काढला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रांवरून काँग्रेस नेत्यांनी तर फडणवीसांना लक्ष्य केलेच, पण त्यांच्यासोबतच स्वतःला तटस्थ म्हणवणार्या निखिल वागळे यांसारख्या पत्रकारांनीही फडणवीसांवर निशाणा साधला. सोनिया गांधी यांना पत्र लिहून मांडलेल्या महाराष्ट्राच्या कोविड परिस्थितीवरून फडणवीसांना वागळेंनी महाराष्ट्रद्वेष्टा ठरवले. वागळे यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातील घाण आणि गरळ तर तुम्हीच रोज गिळता. तरी तुम्ही येथेच रहा. कारण हा सर्वसमावेशक महाराष्ट्र आहे आणि आम्ही सहिष्णू. देवेंद्र जी फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली की त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची जणू स्पर्धाच लागते. त्या मविआच्या गटारगंगेत आपलेही स्थान आहेच! https://t.co/illeOy30I7
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 16, 2021
हे ही वाचा:
तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
भातखळकर यांचा हा टोला वागळेंना इतका झोंबला की त्यांनी थेट पातळी सोडत अतुल भातखळकर यांना लक्ष्य करायचा प्रयत्न केला. ‘गुलामाचा गुलाम आपली निष्ठा दाखवतो तेव्हा…’ असे म्हणत वागळेंनी भातखळकरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण यावरूनही भातखळकर यांनी वागळेंना चांगलाच टोला लगावला आहे. किती ते फ्रस्ट्रेशन जपा स्वताला परिणाम होईल डोक्यावर अशाने असे म्हणत अतुल भातखळकरांनी वागळेंना चपराक लगावली आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करणाऱ्यांना ब्लॉक करत सुटणारे निखिल वागळे अतुल भातखळकरांना पण ब्लॉक करतात का याकडे नेटकऱ्यांच्या नजरा लागला आहेत.
किती हे फ्रस्ट्रेशन? जपा स्वतःला, परिणाम होईल डोक्यावर अशाने… https://t.co/G5DX96oDdg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 16, 2021