23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणजपा स्वतःला...परिणाम होईल डोक्यावर

जपा स्वतःला…परिणाम होईल डोक्यावर

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी निखिल वागळे यांची चांगलीच खरडपट्टी काढली. निखिल वागळे यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भातखळकर यांचा हा वार वागळे यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी पातळी सोडून भातखळकर यांच्यावर टीका केली. पण यावरूनही भातखळकरांनी वागळेंना जोरदार चिमटा काढला आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रांवरून काँग्रेस नेत्यांनी तर फडणवीसांना लक्ष्य केलेच, पण त्यांच्यासोबतच स्वतःला तटस्थ म्हणवणार्‍या निखिल वागळे यांसारख्या पत्रकारांनीही फडणवीसांवर निशाणा साधला. सोनिया गांधी यांना पत्र लिहून मांडलेल्या महाराष्ट्राच्या कोविड परिस्थितीवरून फडणवीसांना वागळेंनी महाराष्ट्रद्वेष्टा ठरवले. वागळे यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

भातखळकर यांचा हा टोला वागळेंना इतका झोंबला की त्यांनी थेट पातळी सोडत अतुल भातखळकर यांना लक्ष्य करायचा प्रयत्न केला. ‘गुलामाचा गुलाम आपली निष्ठा दाखवतो तेव्हा…’ असे म्हणत वागळेंनी भातखळकरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण यावरूनही भातखळकर यांनी वागळेंना चांगलाच टोला लगावला आहे. किती ते फ्रस्ट्रेशन जपा स्वताला परिणाम होईल डोक्यावर अशाने असे म्हणत अतुल भातखळकरांनी वागळेंना चपराक लगावली आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करणाऱ्यांना ब्लॉक करत सुटणारे निखिल वागळे अतुल भातखळकरांना पण ब्लॉक करतात का याकडे नेटकऱ्यांच्या नजरा लागला आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा