21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणतुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

Google News Follow

Related

तीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी गटाला सर्वोच्च न्यायालयाने आज फटकारले आहे. तुमच्या आंदोलनामुळे संपूर्ण शहराचा गळा आवळला आहे. शेतकरी संघटना, किसान महापंचायतने सर्वोच्च न्यायालयाकडे दिल्लीच्या मध्यवर्ती भागात नियुक्त जंतर -मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. शांततापूर्ण आणि अहिंसक ‘सत्याग्रह’ आयोजित करण्यासाठी किमान २०० शेतकरी किंवा आंदोलकांना जंतर-मंतरवर जागा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची मागणी या गटाने केली होती.

“तुम्ही संपूर्ण शहराचा गळा आवळला आहे, आता तुम्हाला शहराच्या आत यायचे आहे? आजूबाजूचे रहिवासी तुमच्या आंदोलनाने खूश आहेत का? हे धंदे ताबडतोब थांबला पाहिजे.” असे न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना सांगितले की, “एकदा तुम्ही तीन कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली की, तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. जर तुमचा न्यायालयांवर विश्वास असेल तर, आंदोलन करण्याऐवजी तात्काळ सुनावणीसाठी पाठपुरावा करा. तुम्ही न्यायालयीन व्यवस्थेचाही निषेध करता का?” असे न्यायालयाने विचारले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

एअर इंडियाची घरवापसी निश्चित

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर

“तुम्ही महामार्ग रोखता आणि नंतर म्हणता की निषेध शांततापूर्ण आहे. नागरिकांनाही फिरण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. तुम्ही सुरक्षा व्यवस्थेवरही परिणाम करत आहात. तुम्ही संरक्षण कर्मचाऱ्यांनाही थांबवले होते.” असं न्यायमूर्ती खानविलकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा