कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांना कोर्टाने काय सुनावले?

कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांना कोर्टाने काय सुनावले?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या पासपोर्टच्या नूतनीकरण करण्याच्या केसमध्ये लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने जावेद अख्तर यांना सुनावले.

न्यायालयाने या सुनावणीवेळी जावेद अख्तर यांच्या वकिलांना सांगितले की, “तुम्हाला या केसमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.” या केसमध्ये अख्तर यांच्या बाजूने एडवोकेट वृंदा ग्रोवर या न्यायालयासमोर हजर होत्या. त्यांनी असा दावा केला की कंगना राणावत ने पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला होता, त्यामधली काही माहिती ही चुकीची आणि दिशाभूल करणारी होती, त्याच बरोबर तमन्ना ने पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी घोटाळा केल्याचाही दावा त्यांनी केला होता. वृंदा ग्रोवर या त्या काही वकिलांनी पैकी एक आहेत ज्यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अजमल कसाबच्या दया याचिकेवर स्वाक्षरी केली होती.

या प्रकरणावर भाष्य करताना न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती जमादार यांनी असं म्हटलं की, जर आम्ही तुमची याचिका ग्राह्य धरली तर अजून शंभर का नाही? अजून हजार का नाही? पासपोर्ट नूतनीकरणाच्या बाबतीत जबाबदारी सरकारची आहे तुमची नाही. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.

हे होऊन सुद्धा जेव्हा एडवोकेट ग्रोवर या जावेद अख्तर यांच्या बाजूने कोर्टात प्रतिवाद करू लागल्या तेव्हा न्यायमूर्ती जमादार यांनी त्यांना थांबवले आणि कोर्टाचे ऐकायला सांगितले. जास्तच शिंदे असं म्हणाले की, तुम्हाला या प्रकरणात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, कोर्टात याबद्दलची याचिका दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा याचिका जर का कोर्टाने स्वीकारायला सुरुवात केली तर कोर्टाचं काम अमाप वाढेल आणि कारण नसताना कोर्टाचं काम तुंबून राहिल. तो रडायला कोणत्याही केसेस या पूर्ण अभ्यास करून त्याचा निकाल लावता येणार नाही. या केसमध्ये यापूर्वीच रिझवान मर्चंट यांच्यासारखे वकील केस लढवत आहेत. तुम्हाला जे काही याविषयी बोलायचे आहे ते त्यांच्या मार्फत तुम्ही कोर्टात बोलू शकता.

यापूर्वीही जावेद अख्तर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये राजकीय मतभेद अन वरुन अनेक वेळेला खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आहेत. परंतु आता सामाजिक शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडत, जावेद अख्तर यांनी चक्क कंगना राणावत च्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरुद्ध कोर्टात याचिका दाखल केल्याचा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा:

तौक्तेच्या बार्जचा पालघरमधल्या स्थानिक मच्छिमारांना फटका

भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये, कंगना राणावत विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला होता. ही केस आजही कोर्टात आहे आणि या केसचा निकाल लागत नाही तोवर कंगना राणावतच्या पासपोर्टचे नूतनीकरण केले जाऊ नये अशी याचिका जावेद अख्तर यांनी कोर्टात दाखल केली होती.

Exit mobile version