केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहार मधील एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, एनडीएला ४०० हुन अधिक जागा मिळाल्यास मुस्लिम आरक्षण रद्द केले जाईल.बिहार मधील अराह येथे मंत्री अमित शहा यांची आज(२४ मे) सभा पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जनतेला संबोधित करताना म्हणाले की, तुम्ही ४०० चा आकडा पार करून दिल्यास आम्ही विविध राज्यातील मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि ते मागासवर्गीयांना देऊ.यावेळी अमित शहा यांनी आरजेडी आणि काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला.अराहचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना मंत्री अमित शहा म्हणाले, जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत आम्ही दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही.लालू यादव आणि ममता बॅनर्जी यांना मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घ्यायचे आहे, असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा:
विशाल अग्रवालसह इतर आरोपींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी!
हम तो डुबेंगे सनम… काँग्रेसने स्पष्ट केला इरादा
मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जींना दिलेला झटका अगदी योग्य!
अपघातावेळी गाडीचं स्टीयरिंग वेदांतच्या हाती!
ते पुढे म्हणाले, कर्नाटकात मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देण्यात आले.हैदराबादमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण मिळाले.ममता बॅनर्जी यांनी १८० जातींना आरक्षणातून वगळले, असे अमित शहा यांनी सांगितले.
लालू यादव यांच्यावर हल्ला चढवत मंत्री शहा म्हणाले की, आरजेडीने ओबीसींसाठी कोणतेही काम केलेलं नाही, स्वतःच्या जातीतील लोकांसाठी कोणतेही काम केले नाही.यांनी फक्त आपल्या कुटुंबियांना पुढे नेण्याचे काम केले.त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मंत्री केले.ते आपल्या कुटुंबाचा विचार करत असल्याचे मंत्री अमित शहा म्हणाले.