तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता आहे. तसे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आलेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतिय कामगार पुन्हा एकदा आपल्या गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर परप्रांतिय मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. यावरुन भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावलाय.

“एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुषार” सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!” अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय.

हे ही वाचा:

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

लॉकडाऊनची घोषणा आजच?

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

“मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत. रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मा.मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?, असा खोचक सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारलाय.

Exit mobile version