30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणजुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यातील एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. ‘जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात’ असे वाघ यांनी म्हटले आहे.

मंगळवारी फडणवीस यांनी आपल्या जळगाव जिल्ह्याचा पाहणी दौरा सुरु केला. यावेळी त्यांनी मुक्ताईनगर येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. वादळी पावसामुळे या परिसरातील केळी बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या साऱ्या नुकसानग्रस्त भागाची फडणवीस यांनी पाहणी केली. तर त्याचवेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी असे गाऱ्हाणे फडणवीस यांच्याकडे मांडले. ‘तुम्हीच आमचे माय बाप आहात, तुम्हीच आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्या’ अशी विनंती नागरिकांनी फडणवीसांना केली.

हे ही वाचा:

अब की बार, फिर से ३०० पार

रा.स्व.संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

यांना समाज बांधवांची काळजी की पराभवाची भीती?

तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा

या संबंधीत एक व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाज माध्यमांवरील खात्यांवर प्रसारित केला. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच प्रसिद्ध झाला असून त्या व्हिडिओच्या आधारे नेटकरी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र डागताना आणि फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही आपल्या ट्विटर खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

चित्रा वाघ लिहितात, “FB वर नाही तर थेट जनतेत जाणारा नेता..आजचा जळगावचा हा व्हिडीओ, देवेंद्रजींना…हि ताई सांगतीये तुम्हीचं आमचे मायबाप, आमचं खुप नुकसान झालयं लक्ष द्या. जनतेचा विश्वास आज ही देवेन्द्रजींवरचं. जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात!”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा