५ ऑक्टोबर, मंगळवारी, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आणि श्रीनगरमधील इक्बाल पार्क परिसरात फार्मसी चालवणाऱ्या सुप्रसिद्ध काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांची हत्या केली. इस्लामी दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांना हिंसक पद्धतीने खोऱ्यातून पळवून लावले होते. १९९० च्या काळात बिंदरू हे काही काश्मिरी पंडितांपैकी एक होते ज्यांनी काश्मीर खोरे सोडले नव्हते.
Daughter of Kashmiri Hindu chemist Makhan Lal Bindroo who was killed by terrorists yesterday in Kashmir dares the coward terrorists and stone-pelters in the valley. “I am my father’s Kashmiri Hindu daughter. Come and face me if you have guts”, she says. pic.twitter.com/G5pwc83eSa
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) October 6, 2021
आज एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात मखन लाल बिंद्रू यांची तरुण मुलगी डॉ श्रद्धा बिंद्रू मीडियाशी बोलताना दिसली. तिच्या वडिलांची हत्या करणाऱ्या अज्ञात दहशतवाद्यांना एका धाडसी संदेशात, तरुणी म्हणाली की, “दगडफेक आणि हिंसाचार करण्यात हे सर्व दहशतवादी सक्षम आहेत.”
“मी प्राध्यापक आहे, माझा भाऊ प्रसिद्ध डॉक्टर आहे, माझी आई आमचे दुकान चालवते. आमच्या वडिलांनी शून्यापासून सुरुवात केली होती, त्यांनीच आम्हाला घडवले आहे. हे लोक (दहशतवादी) फक्त शरीराला मारू शकतात, पण आत्म्याला नाही. ते अर्थपूर्ण चर्चा किंवा समंजस वादविवाद करण्यास सक्षम नाहीत. दगडफेक आणि गोळ्या झाडणे एवढेच ते करू शकतात.” असं तिने कॅमेऱ्यासमोर सांगितले.
“तुम्ही लोकांनी देह मारला आहे, पण तुम्ही माझ्या वडिलांचा वारसा आणि त्यांचा आत्मा मारू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात हिंमत आहे, तर आमच्यासमोर बसा आणि चर्चा करा. मी इथे आहे, माझ्या काश्मिरी पंडित हिंदू वडिलांची काश्मिरी पंडित हिंदू मुलगी. या आणि माझा सामना करा. असे त्या मुलीने आव्हान दिले.
५ ऑक्टोबर रोजी जम्मू -काश्मीरमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी ३ निरपराध नागरिकांची हत्या केली. बिंद्रू व्यतिरिक्त, वीरेंद्र पासवान नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पासवान हा एक पाणीपुरी विक्रेता होता जो भागलपूरचा होता. तो आलमगारी बाजार झाडीबल परिसरात राहिला.
हे ही वाचा:
२०२५ मध्ये चीन तैवानवर कब्जा करणार?
एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?
हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय
तिसरा बळी मोहम्मद शफी लोन, नायडखायचा रहिवासी होता. ज्याची उत्तर काश्मीरमधील बांदीपूरच्या शाहगुंड परिसरात दहशतवाद्यांनी हत्या केली होती. लोन हे स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष होते.