योगी सरकारने मागवल्या १ कोटी लसी

योगी सरकारने मागवल्या १ कोटी लसी

Photo credit ANI

देशात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. रोजच्या रोज देशभरात लक्षावधी नागरिक कोरोनाने बाधित होत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हा एक सशक्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्ये लसीकरण वाढवण्याच्या प्रयत्नात असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १ कोटी लसींची मागणी केली असल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

भारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस

शीतल जोशी-कारूळकर सेन्सॉर बोर्डावर

महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य  निकाल

लसीकरण हा कोविडविरूद्धच्या लढाईतील परिणामकारक मार्ग म्हणून समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राज्यासाठी १ कोटी लसींची खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली असल्याचे सांगितले. त्याबरोबरच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सुद्धा लस उपलब्ध झाली आहे. योगी सरकारने थेट कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी लस सतत उपलब्ध रहावी यासाठी योगी सरकारने लस खरेदीसाठी जागतिक निवदा काढल्या आहेत. यामार्फत योगी सरकार तब्बल पाच कोटी लसींची खरेदी करू इच्छित आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आश्वस्त केले आहे.

देशात सध्या वेगाने लसीकरण चालू आहे. लसीकरणाचा परिघ वाढवण्यासाठी आजपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. आत्तापर्यंत भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची मदार केवळ कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांच्यावर होती. त्याबरोबर केंद्र सरकारने आणखी पाच परदेशी लसींना देखील परवानगी दिली आहे. त्यापैकी स्पुतनिक या लसीची पहिली खेप आज भारतात दाखल होणार आहे.

Exit mobile version