योगी करणार श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी

योगी करणार श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी

रामजन्मभूमीच्या मुख्य मंदिराचे बांधकाम १ जूनपासून सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहाच्या ४०३ चौरस फूट जागेवर १३ हजार ३०० घनफूट संगमरवरी कोरीव दगड बसवले जाणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १ जून रोजी त्याची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता वेदपूजनाने होणार आहे. मुख्यमंत्री योगी यांचा १ जून रोजी अयोध्या दौरा होणार असून, त्यादरम्यान ते राम मंदिराला लागून असलेल्या दक्षिण शैलीतील मंदिराच्या ट्रस्टच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. रामललाच्या गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर २०२३  पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यामुळे या भागात रामलला बसणार असलेल्या कोठडीचे बांधकाम सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ. मिश्रा यांनी दिली.

हे ही वाचा:

हिंदुस्तान झिंकमधील संपूर्ण हिस्सा विकणार सरकार

नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

लाखाच्या कर्जासाठी लहान मुलांसह स्वतःच केली ऊसतोड

आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट

दरम्यान, ०५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या गर्भगृहात पूजा करून बांधकामाला चालना दिली होती. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये बांधकाम साइटचे जीपीआर सर्वेक्षण केल्यानंतर, मंदिराच्या जागेवरून सुमारे १.८५ लाख घनमीटर मलबा आणि जुनी माती उत्खनन करून सुमारे सहा एकर जमीन काढण्यात आली. या कामाला सुमारे तीन महिने लागले होते.

Exit mobile version