एबीपी न्यूज आणि सी-वॊटरने नवीन सर्वे केला आहे. या सर्व्हेमध्ये २०२२ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज मांडला आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार उत्तर प्रदेशात येऊ शकते.
उत्तरप्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला ऐतिहासिक बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत भाजपा आणि काही छोटे मित्रपक्ष मिळून एनडीएला ४०३ पैकी ३२५ जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत भाजपाला तसेच यश मिळवता येईल का? शेतकरी आंदोलनाचा पश्चिम उत्तरप्रदेशात भाजपाला फटका बसणार का? जर नुकसान झाले तर किती होईल? असे सगळे प्रश्न सामान्य जनतेलाही पडत होते. याच वेळी हा सर्वे आला आहे.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
काय आहे एबीपी न्यूज, सी-वॊटरच्या सर्व्हेमध्ये?
एबीपी न्यूज, सी-वोटरच्या या सर्व्हेमध्ये भाजपाला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळताना दिसत आहे. या सर्व्हेमध्ये ४०३ पैकी २८४-२९४ जागा या भाजपाला मिळणार असल्याचे दिसत आहेत. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ५४-६४ जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. तर मायावतींच्या बसपाला ३३-४३ जागा मिळतील. काँग्रेस पक्ष १-७ जागांवर असेल तर इतर पक्षांना १०-१६ जागा मिळतील असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे.