उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कामे करत आहे. यामध्ये युपीमध्ये लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी योगी सरकराने योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. योगी सरकारने बस प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक बस स्टँड बनवत आहेत. युपी परिवहन विभाग पीपीपी मॉडेलवर अठरा बसस्थानके विकसित करण्याच्या कृती आराखड्यावर काम करत आहे.
प्रवाशांच्या सुविधा सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बसस्थानकांच्या बांधकामासाठी लवकरच ई-निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात निविदाकारांच्या सूचना लक्षात घेऊन लवकरच प्रस्ताव तयार करून शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून परवानगी मिळताच त्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत
महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या शिफारसीनंतर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने केलं कौतुक
पीपीपी मॉडेलनुसार कौशांबी गाझियाबाद, कानपूर सेंट्रल, वाराणसी कॅंट, सिव्हिल लाइन्स, मेरठ, ट्रान्सपोर्ट नगर , इदग, आग्रा फोर्ट , अलीगढ, मथुरा, गाझियाबाद, गोरखपूर, चारबाग बस स्थानक, झिरो रोड डेपो (प्रयागराज), अमौसी (लखनौ), साहिबाबाद, अयोध्या यांसह अठरा बस स्टँड विकसित केले जाणार आहेत. पीपीपी मॉडेलवर बांधण्यात येणाऱ्या या सर्व बसस्थानकांमध्ये उच्चस्तरीय प्रवासी सुविधा असणार आहेत.