यूपी सरकारने विजेचे नवे दर जाहीर करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने १०० रुपयांचा स्लॅब मागे घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेटर नोएडामध्ये विजेचे दर सुमारे दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत.
नवीन दरांनुसार ३०० युनिटपेक्षा जास्त वीज खर्च करण्यासाठी ६.५० रुपये इतका कमाल दर आकारला जाणार आहे. १५१ ते ३०० युनिटपर्यंत सहा रुपये, १०१ ते १५० युनिटपर्यंत साडेपाच रुपये युनिट दराने वीज उपलब्ध होणार आहे. शून्य ते १०० युनिटपर्यंत वीज पाच रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. घरगुती बीपीएल वीज तीन रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध होणार आहे.
यूपी राज्य वीज ग्राहक परिषदेचे अध्यक्ष अवधेश वर्मा म्हणाले की, यूपी वीज नियामक आयोगाने राज्यातील १.३९ कोटी गरीब ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या ग्राहकांकडून यापूर्वी ३.३५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आता ते फक्त तीन रुपये दर देतील.
हे ही वाचा:
शिवसेना कुणाची? कागदोपत्री पुरावे सादर करा!
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी
आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला म्हणजे शहरी घरगुती ग्राहकांसाठी कमाल ७ रुपयांचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे. एक प्रकारे साडेसहा रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. ग्रामीण भागातील घरगुती ग्राहक आतापर्यंत जास्तीत जास्त सहा रुपये देत होते, आता ते ५.५० रुपयांपेक्षा जास्त पैसे देणार नाहीत.