योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभू श्री रामांची अयोध्या नगरी चर्चेत आहे. याच अयोध्या नगरीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयानुसार,अयोध्येतील एका चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कोणत्या चौकाला हे नाव द्यायचे, याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला योगी आदित्यनाथ यांनी १५ दिवसांचा वेळ दिला असून त्यासंदर्भात प्रस्ताव सादर निर्देश दिले आहेत.

युपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगी यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी त्यांच्या या घोषणेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले होते. लता मंगेशकरांचे एका चौकाला नाव दिले जाईल, ही लता मंगेशकर यांच्यासाठी एक श्रद्धांजली असेल. जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी पर्यटक, भाविक येतील येतील, तेव्हा या निमित्ताने लता मंगेशकर यांच्या गाण्यांचेही त्यांना स्मरण होईल, असे योगीजी म्हणाले आहेत.

६ मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा अयोध्येत दर्शन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराची पाहणी केली व अयोध्येच्या विकास कामांबाबत माहिती घेतली होती. याचवेळी ते म्हणाले होते की, अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

श्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

दरम्यान, लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले होते. त्यांच्या या निधनाने देशात शांतात पसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर मुंबईत त्यांना श्रद्धांजली देण्यास आले होते.

Exit mobile version