योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले

योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले

राज्याच्या राजकारणात सध्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असताना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मात्र बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर असलेले ५३ हजाराहून अधिक बेकायदा भोंगे उतरवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हा निर्णय घेतला असून एकूण ६० हजार भोंग्यांचे आवाज हे नियमाच्या अधीन असल्याचे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली.

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर असलेले बेकायदा भोंगे आणि लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी २६ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ५३ हजार ९४२ भोंगे उतरवण्यात आले तर ६० हजार २९६ भोंगे हे आवाज नियमानुसार असल्याचे आढळून आल्याची माहिती अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उतरवले गेलेले भोंगे हे बेकायदा असून विनापरवानगी ते लावण्यात आले होते.

हे ही वाचा:

स्पाईसजेट विमानाला लँडिंगवेळी अपघात; ४० जण जखमी

पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला

“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”

४ तारखेपासून ऐकणर नाही…भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. उत्तर प्रदेशमधील बेकायदा भोंगे काढल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. रविवार, १ मे रोजी झालेल्या त्यांच्या भाषणातूनही त्यांनी भोंग्याच्या मुद्द्याला उचलून धरले. कालच्या सभेमध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भोंगा प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

Exit mobile version