हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना रानौत हिने शुक्रवार ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. या भेटीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक खास भेटवस्तू दिली आहे. तर कंगना हिला उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेचे ब्रँड अँबेसिडर सुद्धा घोषित करण्यात आले आहे.
कंगना हिला भेटल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी तिला एक नाणे भेट केले आहे. पण हे कोणते साधेसुधे नाणे नसून राम जन्मभूमी पूजनाच्या वेळी वापरण्यात आलेले हे नाणे आहे. कंगनाने याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. तर त्यासोबतच उत्तर प्रदेश सरकारने ‘तेजस’ या तिच्या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सहकार्य केल्याबद्दलही सरकारचेही कंगनाने आभार व्यक्त केले आहेत. यावेळी कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारच्या कामाचेही भरभरून कौतुक केले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी योगींना शुभेच्छाही दिल्या आहेत.
हे ही वाचा:
कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू
राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू
ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे
एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही
कंगना ही आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या योजनेची ब्रँड अँबेसिडरही असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट’ (ओडिओपी) अर्थात ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या महत्त्वाकांक्षी योजनेची कंगना ब्रँड अँबेसिडर असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेत्री कंगना रणवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर या संबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या भेटीत योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला ‘ओडिओपि’ ची काही उत्पादनेही भेट स्वरूपात दिली आहेत.