पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

पुढली कारसेवा जेव्हा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथे झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे. ‘काशी, मथुरा बाकी है’ अशा घोषणा कायमच ऐकू येत असताना त्यासाठी लवकरच कारसेवा होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

३१ वर्षांपूर्वी या वेळी काय झालेले हे आपण पाहिले आहे. रामभक्त कारसेवकांवर गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. पण आता तसे होणार नाही. आता जर कारसेवा झाली तर रामभक्त, कृष्णभक्त कारसेवकांवर गोळ्या चालवल्या जाणार नाहीत तर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येईल.

हे ही वाचा:

मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट

शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?

भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट

लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या

तर पुढे ते म्हणाले की, अयोध्या आता एक नवे सांस्कृतिक नगर म्हणून जगभरात उजळून आले पाहिजे असे योगी आदित्यनाथ म्हणाले. अयोध्येत आता प्रभू श्रीरामांचे भव्य राम मंदिर तयार होण्यात कोणतीही अडचण नाही. जगातील कोणतीच ताकद भगवान रामचंद्रांच्या भव्य मंदिराचे निर्माण २०२३ च्या आधी पूर्ण होण्यापासून थांबवू शकत नाही असे प्रतिपादन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी २०१७ सालच्या पहिल्या दीपोत्सवाची आठवण सांगितली. “२०१७ साली जेव्हा मी अयोध्येतील पहिल्या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी आलो होतो तेव्हा इथे जमलेले युवक एक घोषणा देत होते. ‘योगी जी एक काम करो, मंदिर का निर्माण करो’ अर्थात योगीजी एक काम करा, राम मंदिर निर्माण करा. तेव्हा मी सांगायचो की मंदिरासाठी आधारशीला तयार केली जात आहे. आज आपण सांगा मंदिर निर्माण होत आहे के नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

Exit mobile version