भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही समाज माध्यमांवर कायमच चर्चेत राहणारी व्यक्तिमत्व आहेत. पण रविवार २१ नोव्हेंबर रोजी या दोघांबद्दल समाज माध्यमांवर खूपच जास्त चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यामागे कारणही तसेच होते.
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचे दोन फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहे. दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनो योगींनी हे फोटो ट्विट केले. त्यापैकी एक फोटो हा चेहऱ्याच्या बाजूने काढण्यात आला आहे. तर दुसरा पाठीमागच्या बाजूने काढला गेला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. ज्यामध्ये मोदींनी आपला हात योगींच्या खांद्यावर टाकला आहे आणि ते योगी आदित्यनाथ यांना काही गोष्टी समजावून सांगत आहेत.
हे ही वाचा:
ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?
हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट
अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?
…एक नया भारत बनाना है!
हे फोटो पोस्ट करताना योगी आदित्यनाथ यांनी हिंदी भाषेतून चार ओळी लिहिल्या आहेत. क्षितिजापेक्षा उंच जाऊन एक नवा भारत बनवायचा आहे असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदीमध्ये ते लिहितात,
हम निकल पड़े हैं प्रण करके अपना तन-मन अर्पण करके जिद है एक सूर्य उगाना है अम्बर से ऊँचा जाना है एक भारत नया बनाना है
https://twitter.com/myogiadityanath/status/1462311575247679489?s=20
योगी आदित्यनाथ यांनी हे फोटो ट्विट केल्यावर समाज माध्यमांवर धुरळा उडाला. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. देशातील कोट्यावधी नागरिकांनी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप अशा विविध सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून हे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याबद्दलची आपली मते देखील व्यक्त केली आहेत. अनेकांनी तर ‘देशाचे वर्तमान आणि भविष्य’ असे या फोटोंच्या बाबतीत म्हटले आहे.