योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. यातील उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. भाजपने शनिवार, १५ जानेवारी रोजी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने आज १०५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ५८ जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी भाजपने ५७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तर दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने दुसऱ्या टप्प्यातील ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने एकूण १०५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

हे ही वाचा:

ब्रिटनची धुरा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती?

२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार ते गोरखपूर येथून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Exit mobile version